पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आगमन

स्नेहा वैभव नाईक यांनी केले उद्धव ठाकरेंचे औक्षण

    शिवसेना - इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील सरकारी रुग्णालयासमोरील पटांगनात माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नुकतेच उद्धवजी ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी आगमन झाले असून आमदार  वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक  यांनी उद्धवजी ठाकरे यांचे औक्षण करून आ. वैभव नाईक, मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!