चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश

चिंचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्याकडून धक्कातंत्राचा धडाका

चिंचवली सरपंच अशोक पाटील, यांनी भारतीय जनता पार्टीत आज पक्षप्रवेश केला. सरपंच, सदस्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश झाला.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील भालेकर, अनंत भालेकर,संजय भालेकर, राजेंद्र पेडणेकर, चंदू पेडणेकर,संतोष भालेकर , पांडुरंग पेडणेकर,रश्मी पेडणेकर, प्रमिला पाटील, महेश बांदिवडेकर, दीपक बांदिवडेकर, गुरुनाथ आंब्रे,अक्षता आंब्रे, चंद्रकांत पेडणेकर, मधुकर बांदिवडेकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
केंद्रीय उद्योग मंत्री , महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन चिंचवली गावच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करत असल्याचे सरपंच अशोक पाटील यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जिल्हा परिषद माजी सभापती बाळ जठार,पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, हरकुळ सरपंच बाबू रासम,माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपटन शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर ,सरपंच रवी शेटये,राजू जठार,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!