पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वासामन्य जनतेसाठी 54 योजना आणल्या!

केजरीवाल नंतर उद्धव ठाकरे तुरुंगात जाणार!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल

जागतिक स्तरावर कौतुक होणारे पंतप्रधान मोदी साहेब यांचे कार्य : निलेश राणे

आचरा | अर्जुन बापार्डेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन हिताला नेहमी प्राधान्य दिले. सर्वासामन्य जनतेसाठी 54 योजना आणल्या. विरोधकांनी काय केले असा सवाल ना. राणे यांनी करत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न अबकी बार चारसो पार पुर्ण करताना तुमच्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवा. असेही आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच गेली 34 वर्षे महाराष्ट्रात देशात काम करत आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अर्थमंत्री यांसह अनेक सहकारी यांनी केलेले कौतुक नेहमीच आनंददाई ठरते. मला मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील जनता उत्सूक दिसून येत आहे. तर रत्नागिरी मधील जनता नारायण राणे यांना पहिल्यांदा मतदान करायला मिळणार म्हणून उत्साही आहे. त्यामुळे मला निसटता विजय नको तर अडीज तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आचरा जिल्हा परिषद मतदार संघात चिंदर सडेवाडी येथे झालेल्या महायुतीच्या जाहिर सभेत केले. यावेळी त्यांनी मी जिल्ह्यात आणलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणून कमिशन खाणारे खासदार जिल्ह्याचा विकास काय करणार असा टोलाही विनायक राउतांचे नाव न घेता लगावला. तर उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्री काळात भ्रष्टाचार करणारे उद्धव ठाकरे केजरीवाल नंतर तुरुंगात जाणार असेही ना. राणे म्हणाले.

यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेते निलेश राणे, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे, बाबा परब,पुजा करलकर,मिलिंद कुलकर्णी, संदीप मेस्त्री, संतोष कोदे, राजन गांवकर, दिपक सुर्वे, शेखर कांबळी, निलेश कांबळी, राजन पांगे, स्वरा पालकर, हिमाली अमरे, प्रफुल प्रभू, दत्ता वराडकर यांसह ग्रामस्थ महिलां बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले जगाच्या अर्थव्यवस्थेत अकरा नंबरवर असलेली भारताची अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात पाचव्या क्रमांकावर आणली.हि साधी गोष्ट नाही तरी विरोधक मोदीजींनी काय केले म्हणतात. कोरोना काळात 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य दिले. आजही सुरु आहे आणि पुढील पाच वर्ष मिळणार म्हणून जाहिरही केले‌ आयुष्यमान भारत ,घराघरात नळ,शेतकऱ्यांच्या नावावर सहाहजार रुपये अशा 54योजना राबविल्या ‌पुर्वी 74 विमानतळ होते मोदींच्या काळात हा आकडा 175वर पोहचला.अनेकांना घरे दिली.पण यांच्या अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कुणाला एक घर पाच किलो धान्य तरी दिले का असा प्रश्न विचारत कोरोना काळात मोदीजींनी औषधासाठी करोडो रुपये पाठविले. त्यात पंधरा टक्के कमिशन साठी अनेकांची टेंडर बाद केली.त्याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे केजरीवालनंतर लवकरच हे तुरुंगात जातील.त्यामुळे यांची काहीही बडबड सुरु असल्याची टिका राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

जागतिक स्तरावर कौतुक होणारे पंतप्रधान मोदी साहेब यांचे कार्य : निलेश राणे

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी सांगितले की कॉंग्रेस सरकार काळात घोटाळ्यांचीच चर्चा व्हायची पण मोदींच्या दहा वर्षाच्या काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. जागतिक स्तरावर कौतुक होणारे पंतप्रधान मोदी साहेब यांचे कार्य आहे. आता भाजप चारसो पार जाणार. निवडणूक अर्ज दाखल करताना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला असा कोणालाही मिळत नसतो. राणेसाहेबांवरचे एवढ प्रेम बघून भारावून जायला झाल्याचे म्हणाले. आजची आचरा विभागाची सभा बघितली तर विनायक राऊत यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी मध्ये जेवढी गर्दी केली होती त्यापेक्षा ही जास्त आहे. दहा वर्षात यांनी विकास काय केला केवळ राणे कुटूंबावर टिका करणे एवढेच काम केले. सभागृहात यांनी प्रश्न उपस्थित केले ते फक्त कॉलेजची मुले काय खातात पिझ्झा आणि वडापावाचेच.
विनायक राऊत दहा वर्षात आपण काय केले ते सांगत नाहीत तर राणेंनी काय केले नाही तेच बोलतात.मालवण कुडाळ मतदार संघ एवढा पिंजून काढणार आणि राणेसाहेबांना एवढे लिड देणार की वैभव नाईकही विधानसभेची उमेदवारी भरताना विचार करतील. यावेळी प्रभाकर सावंत, मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना राणे साहेबांची चिट्ठी

सभा शुभारंभ प्रसंगी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केलेल्या भाषणाने प्रभावित होत नारायण राणे यांनी त्यांना चिठ्ठी पाठवत धोंडीजी अप्रतिम, जोशपूर्ण भाषण अभिनंदन असा गौरव केला. आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती राणेयांचा आदरभाव चर्चेचा विषय ठरला होता ‌

error: Content is protected !!