दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे सदानंद गडावरील विहीरीची स्वच्छता

      आज दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी देवगड तालुक्यातील ऐतिहासिक सदानंद गडावरील चौकोनी विहीर दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ करण्यात आली.
      अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे सदर चौकोनी विहिरीमध्ये झाडे वाढलेली होती. त्यामुळे झाकोळलेल्या या विहिरीची स्वच्छता दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली.
      या मोहिमेत गणेश नाईक, समिल नाईक, गार्गी नाईक, हेमलता जाधव प्रविण नाईक, मुकेश जाधव, अक्षय जाधव, निखिल कांबळे, सौमित्र कदम, सुमेध नाईक ईत्यादीनी सहभाग घेतला. उपस्थितांना हेमालता जाधव यांनी अल्पोपहाराची सोय केली. सदर मोहिमेस साळशी ग्रामपंचायतने परवानगी दिल्याबद्दल सरपंच उपासरपंच व ग्रामपंचायत यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. लवकरच सदर विहिरीचा गाळ काढण्यात येणार आहे.
error: Content is protected !!