साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी सावंतवाडी वन विभागाला साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल बिबट्याच्या सुटकेसाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्या अडीच वर्षे वयाचा होता. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. बिबट्या विहिरीत पाईपच्या सहाय्याने लोंबकळत तग धरून राहिला होता.
त्यानंतर विहिरीतून बाहेर येण्यासाठी सोडलेल्या शिडीचा आधार घेऊन बिबट्या विहिरीच्या बाहेर यशस्वीरीत्या बाहेर आला व नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी

error: Content is protected !!