सरपंचांना अधिकारवाणीने बोलण्याचा नितेश राणेंना अधिकारच!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचे आमदार वैभव नाईक यांना उत्तर

मतदार संघातील सरपंचांना अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार आमदार नितेश राणे यांना आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात विकास कामासाठी निधी हवा असल्यास सरपंच म्हणून आम्ही केव्हाही आमदार राणे यांच्याकडे गेल्यावर हवा असेल तेवढा निधी गावच्या विकास कामांना मिळतो. त्यामुळे आम्ही सरपंच म्हणून निवडून येण्यात आमदार नितेश राणे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी सरपंच यांना दिलेली ती धमकी नसून केलेले आवाहन आहे. त्यामुळे याबाबत विनाकारणी जनतेमध्ये गैरसमत पसरवू नका. असे आवाहन वागदे सरपंच संदीप सावंत यांनी करत आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!