मालवण मधील सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेहमेळावा १६ एप्रिलला

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक असोसिएशन शाखा मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथ.शिक्षक शिक्षक , उच्चश्रेणी मुख्याध्यापक , पदवीधर , केंद्रप्रमुख , आणि विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि . १६ / ०४ / २०२४ रोजी सकाळी ९.०० वा . *जानकी मंगल कार्यालय शिवाजी पुतळ्या जवळ जरीमरी कुंभारमाठ येथे आयोजित केला आहे .
सकाळी ९ ते १० नावनोंदणी व चहापान असेल व बरोबर १० वा . कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष मा श्री .सावळाराम अणावकर , गटशिक्षणाधिकारी मा . श्री . संजयजी माने साहेब , गटविकास अधिकारी मा . श्री . आत्मज मोरे साहेब . पोलिस निरीक्षक मा. श्री . अरुण कोल्हे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .
या मेळाव्यात जानेवारी २२ पासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच ज्यांनी मार्च २४ मध्ये ७५ वर्ष पूर्ण केली त्या ७५ वर्षावरील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक आपले कलागुणही सादर करणार आहेत .
या मेळाव्याला मा . अरुण कोल्हे साहेब पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मालवण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून जेष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत . तर सुरेशजी श्यामराव ठाकूर गुरुजी अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण हे आनंद अक्षरांचा या विषयावर आनंदी जीवनासाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत .
यावेळी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर , जिल्हा सरचिटणीस सुंदरजी पारकर , जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी , नारायण सावंत, किशोर नरसुले सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य , सर्व तालुका अध्यक्ष त्यांचे सदस्य तसेच मालवण तालुक्यातील जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे व प्रताप बागवे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .
तरी तालुक्यातील
सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस आनंद धुत्रे , सहसचिव रुपाली पेंडूरकर , उपाध्यक्ष ज्ञानदेव ढोलम व मिनल सारंग व कोषाध्यक्ष सुरेश चव्हाण आणि तालुका सर्व कार्यकारीणी सदस्यांनी केले आहे.