संजय घोड़ावत ऑलिम्पियाड स्कूलचे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक स्पर्धेत यश;१६ पदकाचे मानकरी

अतिग्रे: ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन यांचे द्वारे आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या राज्यस्तरीय डॉ.होमिभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत
संजय घोड़ावत ऑलिम्पियाड स्कूल ने १६ पदके प्राप्त करत नवा इतिहास रचला.
यात प्रामुख्याने ५ सुवर्ण,६ रौप्य,५ कास्यपदकांचा समावेश आहे. वेदांत जम्बुरे,महिर मगदूम, अद्विता कोगनोले,हिरा बारगले,अर्णव घुणके यांनी सुवर्णपदक पटकावले. तर आदिती चौगुले, रितिका कालिया, संजीत कोले, आयुष सपकळ, आदित्य मगुम,ध्रुव बहेती यांनी रौप्य व साफिया शिकलगार, पलक राजपूत, ऋतुजा कुलकर्णी, सिया मडलगी, मिहिका इंगोले यांनी कास्यपदक पटकाविले.
तसेच या स्कूल ने विक्रम साराभाई गुणवत्ता स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पदके प्राप्त करून विशेष विक्रमांची नोंद केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय घोडावत , संचालक श्री वासु सर, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढ़िल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!