टोपीवाला प्राथमिक,हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व जयगणेश स्कूल: माजी विद्यार्थ्या ंच्या डाटाबेस चे काम सुरू

प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने डाटा देण्याचे आवाहन
क्यू आर कोड मध्ये डाटा भरण्याचे आवाहन
मालवण – टोपीवाला हायस्कूल टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय टोपीवाला प्राथमिक शाळा तसेच जय गणेश स्कूल
मधून शिकून बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करण्याचे काम जोमाने चालू आहे. हे काम टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने हाती घेतले आहे. त्याला प्रतिसाद आणि सहकार्यही मिळत आहे.
तरी टोपीवाला प्राथमिक,हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व जयगणेश स्कूलमधून शिकून बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन माजी विद्यार्थी संघटने कडून करण्यात आले आहे आहोत. ज्यांनी आजपर्यंत नोंदणी केलेली नाही त्यांनी खाली दिलेला QR Code स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा व आपली माहिती माजी विद्यार्थी संघटनेला कळवावी.
अधिक माहितीसाठी किंवा आजीवन सभासद बनण्यासाठी शाळेमधील व्यं.ह. सांगावकर ज्ञानमंदिरातील माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाला सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भेट द्या.
खालील क्रमांकावर संपर्कही साधू शकता.
१. माजी विद्यार्थी ऑफिस 95297 86781
२. स्मिता करंदीकर-संकोळी 9881309975
३. संजय वराडकर 94225 96987
11 रोजी मालवणात मेळावा
11 मे रोजी मालवण मधे मेळावा व 12 मे रोजी अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ही स्मिता संकोळी करंदीकर यांनी दिली आहे





