कणकवली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार

नगरपंचायत चे 52 कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर
आज निर्णय न झाल्यास कणकवली शहरात उद्यापासून कचऱ्याचा त्रास
कणकवली नगरपंचायतच्या सुमारे 52 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळाला नाही. यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. या विरोधात नगरपंचायत चे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. कणकवली नगरपंचायत मध्ये एकूण 52 कंत्राटी कर्मचारी आहेत. कणकवली शहरांमध्ये सफाई कामगार आणि ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांवरील चालकांचा समावेश आहे नगरपंचायत च्या वतीने ठेकेदाराकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिलं. मात्र फेब्रुवारी महिन्यातील वेतन आता मार्च महिना संपत आला तरीसुद्धा देण्यात आलेले नाही. वारंवार मागणी करूनही ठेकेदार न कर्मचाऱ्यांच्या वेतन देणारी दुर्लक्ष केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पीएफचे पैसे वजा करून घेतले जातात. मात्र याचवेळी तेवढीच रक्कम सुद्धा पीएफ मध्ये जमा करणे बंधनकारक असूनही ठेकेदार आपल्याकडील पीएफची रक्कम मात्र जमा करत नाही.आणि या विरोधात सुद्धा हे काम बंद आंदोलन आहे. जोपर्यंत आपला फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळत नाही आणि ठेकेदार त्याच्याकडील पीएफची रक्कम जमा करत नाही तोपर्यंत काम बंधन आंदोलनावरती ठाम असण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कणकवली प्रतिनिधी