कणकवली अभाअंनिस तालुकाध्यक्ष पदी भगवान तांबे तर सचिव पदी विद्याधर कदम यांची नियुक्ती

कणकवली – अभाअंनिसमितीचे कणकवली तालुका संपर्कप्रमुख मा. सिद्धार्थ तांबे यांचे अध्यक्षतेखाली बुद्धविहार कणकवली येथे नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गची सभा आयोजित केली होती .
या सभेस कणकवली तालुक्यातील बहुसंख्य सुजाण नागरीक उपस्थित होते . यावेळी एकमताने अभाअंनिसमिती शाखा कणकवलीच्या अध्यक्षपदी भगवान तातू तांबे सेवानिवृत्त मच्छव्यवसाय वसुली अधिकारी मालवण यांची तर सचिव विद्याधर गोविंद कदम सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली . इतर कार्यकारीणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष : विजय महादेव जाधव , संघटक : विजय बाळकृष्ण तांबे , कार्याध्यक्ष : मंगेश प्रकाश चव्हाण , तर सदस्य म्हणून अरुण चिमाजी पवार , शैलेश घाडी , गौतम तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी समितीची भूमिका आणि ध्येय धोरणांची माहिती देऊन आपणाला देव आणि धर्माला विरोध न करता देव आणि धर्माच्या नावाखाली जादूटोणा करणार्या भोंदू बाबाच्या विरोधात चळवळ उभी करावयाची असल्याचे सांगितले . जिल्हा सरचिटणीस अजित कानशिडे यांनी अभाअंनिसमिती बद्दल लोकांच्या मनात असलेला गैरसमज आणि जादूटोणा विरोधी कायदा देवाधर्माच्या विरोधी आहे हि भावना आपल्याला कृतीतून बदलावयाची असल्याचे सांगितले . यावेळी संपर्क प्रमुख सिद्धार्थ तांबे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करून आपल्या संतांनी अभंग व किर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगितले तर महामानवांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचे विचार पुस्तकातून मांडले तर आपल्या कार्यकर्तृवाचा ठसा कृतीतून उमटविला असल्याचे सांगितले .
तर जिल्हा सदस्य अनिल कदम यांनी कणकवली तालुक्यामध्ये अभाअंनिसमितीचे कार्य खेड्यापाड्यात नेऊन पोहोचवूया असे सांगितले .
यावेळी अध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारल्या नंतर भगवान तांबे यांनी कणकवली तालुक्यातील गावागावात व शाळाशाळांमध्ये जादूटोणा विरोधी कायदाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी प्रयत्न करून सर्वसामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न करीत राहीन असे सांगितले . नुतन कार्यकारीणीचे जिल्हा संघटक व जिल्हा सचिव यांचे हस्ते पुच्छ गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .
यावेळी जिल्हा खजिनदार जयराम डामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .