आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये मेडिकल चेक अप कँप संपन्न.
कणकवली/मयुर ठाकूर
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच आरोग्याकडेही तेवढेच लक्ष देऊन मुलांना आरोग्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे मेडिकल चेकअप कॅम्प घेण्यात येतो यावर्षी नुकताच मेडिकल चेक अप कॅम्प प्रशालेत संपन्न झाला कणकवलीतील नामांकित डॉक्टर यावेळी हेल्थ चेकअप साठी निमंत्रित करण्यात आले होते यावेळी बालरोग तज्ञ डॉ.मेघना तायशेटे , तसेच डॉ. प्रशांत मोघे नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रसाद गुरव व डॉ.अशोक कदम दंतचिकित्सक डॉ.अमेय मराठे व डॉ. स्वप्नील राणे या डॉक्टरांनी इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांची तपासणी केली व आवश्यक मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला सर्व निमंत्रित डॉक्टरांचा आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल ,सल्लागार डी.पी तानावडे सर ,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होत