विद्यानिकेतन स्कूल कसाल या ठिकाणी अभिनव बालमेळावा!देश बदलू शकणारी संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी!!
कसाल प्रशाले ने संस्कृतीचे संस्कार मुलांवर घडवण्याचे व्रत अंगिकारलेले आहे. वास्तवात वडाच्या पारंब्यांशी सूरपारंब्या खेळू शकतील, बेधडक झाडावर चढण्याची हिंमत दाखवू शकतील, कृत्रिम टॉयज नव्हे, तर खऱ्या प्राण्यांशी दोस्ती करू शकतील अशी मुले इथे नक्की दिसतील. आजच्या शहरीकरणातही गावाकडची माती आणि मातीतली नाती यांच्याशी मुलांची नाळ जोडणे कठीण झाले आहे.
या सगळ्यातून 30 ,31 मार्च सकाळी दहा ते पाच या वेळेत एक नवीन उपक्रम साकारत आहोत,
एक सुंदर अशे प्रदर्शन (exhibition) भरवले आहे. त्यातून भारतीय संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली यांची ओळख आज शहरातल्या मुलांना पुन्हा नव्याने होणार आहे. “अशी महिती प्रशालेच्या वतीने सुषमा केणी यानि दीली. आहे
“आपल्या वाट्याला जे सुंदर मनमोकळं आणि बेधडक गावाकडचं जगणं आलं ते मुलांना मिळालं नाही याची खंत अनेक पालकांच्या मनात नक्कीच आहे. पण या बाल मेळाव्याच्या निमित्ताने त्या गावाची ओळख मुलांना होऊ शकते. तो काळ अनुभवता येऊ शकतो आणि भारतीय ग्रामसंस्कृती किती व्यापक व समृद्ध होती याचे संस्कार त्या बालमनावर नक्की उमटू शकतात.
गावाकडे जशा छोट्यामोठ्या गुहा असतात, तशीच एक गुहा आहे , इथे त्याना एक नवीन गाव मिळेल. तिथे ती खेळू शकतील. गावाकडची झोपडी, त्यातलं घरपण त्यांना अनुभवता येईल. त्या घरात देवाचा देव्हारा, त्यातील नित्यपाठाच्या ओव्यांची पुस्तके, सुबक सारवलेली शेणाची जमीन, वाळवण घालायला दोरी, त्यावर वाळत घातलेले कपडे, कोपऱ्यातली चूल , दळणा करिता जाते, पट वरवंटा, न्हाणी घर सगळे काही आहे. दारात घराची राखण करणारा कुत्राही पटकन मैत्री व्हावी असाच!
शेजारी छोटी विहीर, विहिरीवर रहाटाची कप्पी, दोरी, कळशी… ज्यातून पाणी शेंदायचं कसं हे ही शिकायला मिळणार. गावात हुंदडायला छानपैकी तरण तलावदेखील (स्विमिंग पूल) आहे, ज्यात मज्जा करायला बंदीच नाही! इथे शेळ्यामेंढ्या, कासव, असे काही खरेखुरे प्राणी पक्षी बघायला मिळणार, फक्त बाकी जंगलातले प्राणी मात्र खेळण्यातले आहेत.
आपले भारतीय जीवनशैलीतले ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, संस्कृती या सगळ्याची ओळख करून देणारी दालने या गावात आहेत. जिथे त्यांना मातीत खेळण्याच्या, विविध कला सादर करण्याच्या आनंदासोबतच विज्ञानाची माहिती घेता येईल. कलाशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन, वस्तुसंग्रहालय, कार्यशाळा, संगीत साहित्य अशा या समृद्ध प्रदर्शनातून हसत खेळत नवीन माहिती घेता येईल,
खूप जुन्या काळातील गोष्टी इथे पाहता येतील, पुस्तकांची ओळख होईल, नवीन खूप खूप आणि बरेच काही शिकता येईल. गुढीपाडवा, रंगपंचमी, शिवजयंती, रामनवमी, मकर संक्रांत, हनुमान जयंती आदी सणांची ओळख या उपक्रमातून वेगळ्या माध्यमातून चित्रमयरित्या करून दिलेली आहे.
एक रम्य गावच उभे करून त्यातून नवी पिढी घडवायचा हा एक प्रयोग आहे. मग आपण सर्वांनी 30 ,31 मार्च सकाळी दहा ते पाच या वेळेत मुलांसोबत आपल्या वेळेनुसार जरूर भेट द्या. व आपल्या दोस्तानाही माहिती द्या. प्रत्येक मुलाला पालकांना येथील प्रत्येक गोष्ट हाताळण्याची संधी मिळणार आहे. “असे सुषमा केणी यांनी सांगीतले
कोणतीही प्रवेश फी नाही . मोफत आहे हा उपक्रम
विद्यानिकेतन स्कूल कसाल, कसाल एसटी स्टँड च्या मागे. येथे हा उपक्रम आहे
अधिक महितीकरीता संपर्क : सुलभा बालम 8329513860 जागृती नारकर 7507202063
येथे करावा असे आवाहन सुषमा. केणी यांनी केले आहे