अ.भा.म.सा.प. कोकण प्रदेशचे ७ वे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी स्व.किशोर संखे हाँल , बोईसर(प.) येथे संपन्न होणार

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोकण प्रदेश अंतर्गत पालघर तालुका आयोजित “७ वे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन” रविवार दिनांक १९/०३/२०२३ रोजी स्व. किशोर गंगाधर संखे हाँल , बोईसर (प.) येथे दुपारी २ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे

    सदर संमेलनाच्या आयोजनासाठी अ.भा.म.सा.प. कोकण प्रदेश अध्यक्ष डॉ. अ.ना.रसनकुटे सर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रदेश पदाधिकारी आणि सदस्य यांची विचारविनिमय बैठक गुरुवार दि. १६/०२/२०२३ रोजी आँनलाईन पध्दतीने गुगल मीट वर यशस्वीपणे पार पडली. सदर बैठकीस कोकणप्रदेश उपाध्यक्षा डॉ. अलका नाईक , कोकणप्रदेश कार्याध्यक्ष शंकरसुत श्री संदिप तोडकर , पालघर जिल्हा अध्यक्ष प्रा.सौ. शुभम पाटील , पालघर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के.डी.संखे , पालघर तालुका अध्यक्ष सौ. उर्मिला घरत, पालघर तालुका सचिव श्री. भूपेंद्र संखे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद गोरे सर आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. "७ वे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन" रविवार दि. १९/०३/२०२३ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत पालघर जिल्हा वंजारी समाजाचे स्व. किशोर गंगाधर संखे हाँल , बोईसर पश्चिम येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
  अ.भा.म.सा.प.कोकण प्रदेशच्या स्व. किशोर संखे हाँल , बोईसर (प.) येथे रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी दुपारी २ ते ६ वेळेत संपन्न होणाऱ्या ७ व्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कविवर्यांनी आपली स्वरचित काव्यरचना १० मार्च २०२३ पर्यत श्री. भुपेंद्र संखे यांच्या ९९७५५६२८०३  या वाँटस अप नंबरवर किंवा शंकरसुत श्री. संदिप तोडकर यांच्या ९४०५०८१५६७ या वाँटस अप नंबरवर पाठवुन काव्यसादरीकरणासाठी नावनोंदणी करावयाची आहे. शीर्षक, काव्यरचना , कवि/ कवयित्री यांचे संपूर्ण नाव, पत्ता , संपर्क नंबर तसेच काव्यरचना स्वरचित असल्याचे घोषणापत्र सदर वाँटस अप नंबर वर पाठवायचे आहे.



जास्तीत जास्त संख्येने काव्यसंमेलनामध्ये सहभागी होऊन साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन

डॉ. अ.ना.रसनकुटे – कोकण प्रदेशाध्यक्ष
डॉ. अलका नाईक – कोकणप्रदेश यांनी केले आहे

ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / मुंबई

error: Content is protected !!