कुडाळ नगरपंचायत हद्दीतील ५८ विधवा महिला लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ५८ महिलांचे अर्ज कुडाळ नगरपंचायतीकडे प्राप्त झाले होते. त्यानुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. त्यामध्ये ५८ विधवा महिला लाभार्थ्यांनी याचा लाभ मिळाला आहे. आज या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात व्यवसायासाठी रक्कम जमा झाली आहे. यामुळे समाजातील विधवा तसेच निराधार महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल.
याबाबतची माहिती नगराध्यक्षा आफ्रिन करोल, उपनगरध्यक्ष मंदार शिरसाट, महिला व बाल कल्याण अक्षता खटावकर तसेच महविकास आघाडीचे सर्व नगरसेवक यांनी दिली.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ