भिरवंडे गावातील विविध विकासकामांचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

भिरवंडे गावासाठी 5कोटींची विकासकामे मंजूर

भिरवंडे गावाचे आणि राणे कुटुंबीय यांचे नाते हे कायमचे आहे त्यामुळे या गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आम नितेश राणे यांनी भिरवंडे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली यावेळी बोलताना आम नितेश राणे यांनी सांगितले तुम्ही सर्वजण राणे साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहात हे नातं आपल्याला असेच पुढे न्यायचे आहे . आपण मागितला तेवढा निधी दिला असून यापुढे ही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,यांनी भिरवंडे गावचा यापूर्वीचा विकास ही राणे साहेबांच्या माध्यमातूनच झाला आहे आणि यापुढील विकास ही त्यांच्याच दूरदृष्टी तुन होणार असून आपण सर्वांनी असेच राणे कुटुंबियांवर प्रेम कायम ठेऊया आणि विकासात अग्रेसर राहूया असे सांगितले यावेळी सौ संजना सावंत, शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे मनिष सावंत,रमेश सावंत, संतोष सावंत, विजय सावंत, अनाजी सावंत, सतीश सावंत बुवा, सुनील सावंत, श्रीकांत सावंत राजेश सावंत, सुरेशचंद्र सावंत, सुभाष सावंत, सदानंद सावंत, बद्रीनाथ सावंत, मिलिंद Inches, सुधीर सावंत, भिरवंडे व खलांतर गांधीनगर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे पाच कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर असून यामध्ये प्रामुख्याने भिरवंडे मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी पन्नास लाख, बजेट मधून पन्नास लाख, डी पी डी सी मधून तीस लाख, रुपये, गांधीनगर खरलवाडी ते हनुमंत वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व खडशी नदी वर ब्रिज बांधणे दोन कोटी सत्तर लाख,मुरडवेवाडी गणेशघाट रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, जांभूळ भाटले स्मशान भूमी रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, जांभूळ भाटले गणेश घाट बांधणे अडीच लाख, जांभूळ भाटले पायावटेवर मोरी बांधणे अडीच लाख, जांभूळ भाटले सदानंद सावंत घर रस्ता डांबरीकरण करणे तीन लाख, शेरडकर वाडी रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, परतकामवाडी रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख, परतकम ख्रिश्चन वाडी रस्ता डांबरीकरण करणे पाच लाख, अशी सुमारे पाच कोटी रुपयांची कामे असून भिरवंडे ग्रामस्थांनी आम नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना सावंत यांचे आभार मानले आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!