नैसर्गिक शेतीच्या कार्यासाठी सौ. प्रतिभा नाईक भालेकर यांचा सत्कार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षा निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता संकुल ओरोस येथे माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ प्रमोद सावंत व शास्त्रज्ञ डॉ विजय देसाई उपस्थित होते. कृषि विज्ञान केंद्र लांजा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आनंद हनुमंते यानी नैसर्गिक शेतीची महिती दिली.
सौ प्रतिभा नाईक भालेकर गेली चार वर्षे कणकवली तालुक्यातील चिंचवली गावात नैसर्गिक शेती करत आहेत. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून त्यानी हळद, आले, नाचणी, भात, काजू इत्यादी पिकांची यशस्वी लागवड करुन विक्रमी उत्पादन घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानच्या त्या नैसर्गिक शेतीच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. तसेच नैसर्गिक शेतीतून पिकविलेल्या मालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅण्डिंग करुन विक्री प्राप्त होण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. किर्लोस कृषि विज्ञान केंद्राच्या त्या संपर्क शेतकरी आहेत. त्यानी नैसर्गिक शेतीच्या केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आनंदोत्सव कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. प्रतिभा नाईक भालेकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंतभोसले, सुमेधा तावडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर व प्राध्यापक उपस्थित होते.
बाळकृष्ण गावडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र