जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश साटेलकर प्रथम

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्य् इंग्लिश स्कूल आचरा ,तालुका मालवण या प्रशालेचा विद्यार्थी कु. सुयश सद्गुरु साटेलकर यांने ‘जल हेच जीवन’ या विषयावर निबंध सादर केला होता.या निबंधाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रोख रक्कम 21000/-( एकवीस हजार) देऊन सुयशचा गौरव करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल मुंबई समिती अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी तसेच स्थानिक स्कूल समिती च्या निलिमा सावंत, बाबाजी भिसळे,राजन पांगे,अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

आचरा / अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!