साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन काव्य स्पर्धा

शैलजा पांढरे आजगाव यांना प्रथम क्रमांक तर श्रेयस शिंदे कणकवली राजू पठाण अमरावती यांना द्वितीय क्रमांक

एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच येथे गौरविण्यात आले

साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेत आजगाव येथील शैलजा पांढरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर श्रेयश शिंदे कणकवली आणि अमरावती येथील राजू पठाण यांना द्वितीय विभागून क्रमांक मिळाला

कणकवली येथील शर्वरी जाधव आनंद जाधव संजय तांबे फोंडाघाट यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला राधिका तांबोळकर कणकवली अंजली मुतालिक कुडाळ यांनाही यावेळी गौरविण्यात आले
साद फाउंडेशनच्या अध्यक्ष लतिका नाईक गीतांजली नाईक सचिव सचिन कोरलेकर वर्षा तळेकर अपूर्वा तळेकर आदी मान्यवर या पारितोषिक प्रसंगी उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण अपूर्वा गोलस्कर यांनी केले

आजगाव प्रतिनिधी (तालुका सावंतवाडी)

error: Content is protected !!