सप्तरंग कलामंच होडावडे यांच्यावतीने ब्रम्हांडनायक हया स्वामी चरित्रावर आधारित नाटकाचे आज आयोजन

सावंतवाडी सप्तरंग कलामंच होडावडे यांच्यावतीने ब्रम्हांडनायक हे स्वामी चरित्रावर आधारित नाटकाचे आयोजन आज 18 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले आहे .होडावडे येथील केंद्रशाळा क्रमांक एक देउळवाडी या ठिकाणी या नाटकाचे आयोजन रात्रौ 9 वाजता केले आहे .तरी स्वामी भक्तगणांनी या नाट्यप्रयोगाच्या लाभ घ्यावा असे आवाहन सप्तरंग कला मंच होडावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. सप्तरंग कलामंच यांनी यापूर्वी अनेक धार्मिक नाटक सादर केली आहेत. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता .त्यामुळे या स्वामी चरित्रावर आधारित पण नाट्यप्रयोगाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद रसिक वर्गाचा लाभणार आहे

error: Content is protected !!