शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या अभिवाचनाने गोपुरी आश्रमात होणार छत्रपतींना अभिवादन

या पुस्तकाचे होणार सामूहिक वाचन

१९, फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या अभिवाचनाने छत्रपती शिवरायांना गोपुरी आश्रमात अभिवादन करण्यात येणार आहे. गोपुरी आश्रमात संध्याकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. खरे छत्रपती समाजाला समजून देण्यासाठी गोविंद पानसरे यांनी लिहिलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायी आहे. छत्रपतींचे कार्य व्यक्ती- व्यक्तीत रूजवण्यासाठी या पुस्तकाचे पारायण होणे गरजेचे आहे. हा संदर्भ समोर ठेवून गोपुरी आश्रमाने हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाला कणकवली व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन गोपुरी आश्रम परिवाराच्या वतीने अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!