शिवजयंती निमित्त ठाकरे शिवसेना मार्फत कणकवली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांचे आवाहन

सोमवार 19 फेब्रुवारी रोजी कणकवली शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी केलेले आहे . तसेच सायंकाळी 4:00 ते 6:00 वाजता हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेले आहे. गांगोवाडी,टेंबवाडी,बाजारपेठ5 आणि सोनगेवाडी या वार्डाचा हळदीकुंकु समारंभ आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महिला जिल्हाप्रमुख सौ.निलम पालव , दिव्या साळगावकर साक्षी आमडोस्कर यांनी केलेले आहे.आणि रात्री सुस्वर भजनांचा होणार आहे अशी माहिती शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांनी दिली.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!