जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान स्व स्वरुप संप्रदाय सिंधुदूर्ग जिल्हा अंतर्गत कुडाळ तालुक्यात रविकमल हाँल येथे रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ येथे झालेल्या रक्तदान शिबिरात एकुण ५८ दात्यांनी रक्तदान केले

श्री गुरुदेव!
महारक्तदान शिबिर
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान स्व स्वरुप संप्रदाय सिंधुदूर्ग जिल्हा अंतर्गत कुडाळ तालुक्यात रविकमल हाँल येथे दि.१६/२/२०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले त्यासाठी प्रमुख पाहुणे श्रीक्षेत्र नानिजध्धाम पिठ सहाय्यक प्रमुख श्रीं. दीपक श्रीधर खरुडे साहेब तसेच जिल्हा संजीवनी प्रमुख कु. रितेश गुरव तालुका सचिव श्री. दीपक पाटकर,तालुका अध्यात्मिक प्रमुख श्री.जगन्नाथ पाटकर तसेच तालुका पदाधिकारी सर्व सेवाकेंद्रा अध्यक्ष इतर भक्तगण उपस्थित होते तसेच दि.१०/२/२०२४ ते दि.२५/२/२०२४ पर्यंत संपुर्ण महाराष्टात तसेच ईतर सहा राज्यामध्ये मिळुन ८५४ पेक्षा जास्त रक्तदान कँम्पचे आयोजन करुन एक लाखापेक्षा जास्त रक्तकुपिका संकलन करण्यात येणार आहे.
काल कुडाळ येथे झालेल्या रक्तदान शिबिरात एकुण ५८ दात्यांनी रक्तदान केले.
याच अनुषंगाने दि.२३/२/२०२४ रोजी कृषि काँलेज,मुळदे याठीकाणी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असुन या शिबिरात सुद्धा जास्तित जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन स्व स्वरुप संप्रदाय कुडाळ तालुक्याच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!