वेंगुर्ला अनिस तालुकाध्यक्ष पदी शिवराम आरोसकर तर सचिव पदी सीमंतिनी मयेकर

वेंगुर्ला – डाँ . संजिव लिंगवत उपाध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या निवासस्थानी नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक श्री . विजय चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा आयोजित केली होती .

या सभेस वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य सुजाण नागरीक उपस्थित होते . यावेळी एकमताने अभाअंनिस शाखा वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी शिवराम आरोसकर तर सचिव पदी सीमंतिनी मयेकर तर वेंगुर्ला तालुका संपर्क पदी स्मिता गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी विजय चौकेकर यांनी समितीची भूमिका आणि ध्येय धोरणांची माहिती देऊन आपणाला देव आणि धर्माला विरोध न करता देव आणि धर्माच्या नावाखाली जादूटोणा करणार्या भोंदू बाबाच्या विरोधात चळवळ उभी करावयाची असल्याचे सांगितले .
यावेळी डाँ . संजिव लिंगवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी सावंतवाडी ज्येष्ठ नागरीक संघांचे कोषाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरुण मेस्त्री यांनीही उपस्थितांना अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असल्याचे सांगितले .
यावेळी अध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारल्या नंतर शिवराम आरोसकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील गावागावात व शाळाशाळांमध्ये जादूटोणा विरोधी कायदाचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी प्रयत्न करून सर्वसामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसिन होणासाठी प्रयत्न करीत राहीन असे सांगितले .
यावेळी विचारमंचावर उपाध्यक्ष डाँ . संजिव लिंगवत सर . जिल्हा संघटीका रुपाली पाटील मॅडम . सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा सदस्य नामदेव मठकर . जनसेवा प्रतिष्ठानचा सचिव डॉ सई लिंगवत , सुनिल गावडे आदी नागरीक उपस्थित होते .

error: Content is protected !!