बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत गोपाळकाल्याच्या उत्साह

दहीहंडी फोडून साजरा केला उत्सव
दैनंदिन शैक्षणिक कामकाजातून जरा विरंगुळा मिळावा या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध सण,उपक्रम नाविन्यपणे साजरे केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर व विविध विभागाचे प्राचार्य,प्राध्यापक शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अगदी नर्सरी पासून ते नर्सिंग चे भावी ब्रदर सिस्टर,फिजिओथेरेपीचे भावी डॉक्टर यांचा उत्साही सहभाग असलेला गोपाळकाला विविध स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या दहीहंड्या फोडून साजरा करण्यात आला.
राधा कृष्णाच्या पोशाखामध्ये विविध बाल विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते आणि उत्साहाने नाचत बागडत या गोपाळकाल्याचा आनंद लुटताना दिसत होते. विविध विभागासाठी बांधलेल्या दहीहंड्या तीन- ते चार, पाच स्तरापर्यंत रचून दही फोडतानाचा आनंद लुटला. या गोपाळ कार्यामध्ये विद्यार्थ्यांसहित बाल विद्यार्थ्यांचे पालक हे सुद्धा अगदी उत्साहाने सहभागी झाले होते. आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शिक्षकांचे, संस्थेचे,शाळेचे आभारही त्यांनी व्यक्त केले.






