सरंबळ देऊळवाडी गणेशघाट आणि विकासकामांचे उद्या लोकार्पण

सरंबळ देऊळवाडी येथील गणेशघाट तसेच देवसेवेकरींच्या पाय धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या पवित्र जागेचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार निलेश राणे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या शुभहस्ते या पवित्र स्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
सरंबळ देऊळवाडी येथील या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले बांधकाम आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या स्वखर्चातून करण्यात आल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहून शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन शिवसेना शाखा सरंबळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.






