अखेरीस वेंगुर्ले कोट डागडुजी करण्यास सुरुवात…

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा उचललेल्या वेंगुर्ले कोट उर्फ किल्ले डच वखारची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत होती. या पार्श्वभूमीवर जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेली दहा ते बारा वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिमा राबविल्या जात होत्या .
वेळोवेळी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात गाठीभेटी घेऊन वेंगुर्ले कोटीच्या दुरुस्तीसाठी निवेदन पण देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेंगुर्ले कोट बाबतीत वेळोवेळी लिखाण करुन या किल्ल्याच्या दुरुस्ती कडे लक्ष वेधण्यासाठी पद्मश्री परशूराम गंगावणे यांनीहि पाचारण केलं होतं आणि आज सगळ्या प्रयत्नाना यश येऊन वेंगुर्ले कोट या किल्ल्याची डागडुजी काम सुरू करण्यात आल्याने जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पुरातत्व विभागाचे आभारी आहोत असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले कोटीच्या दुरुस्ती कामाच्या पाहणी प्रसंगी केले. यावेळी कंत्राटदार कर्मचारी कुमार जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

सालाबाद येथे डॉक्टर संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवित असुन वेळोवेळी मी किल्ले डच वखार संवर्धन व संरक्षण बाबतीत पुरातत्व विभागाला फक्त सुचनाच केल्या नाहीत तर रत्नागिरी येथे जाऊन या बाबतीत जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता

error: Content is protected !!