पूर्णानंद महिला मंच कणकवली आयोजित गणेशोत्सव सण पूरक वस्तूंच्या विक्री महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ

आज रात्री पर्यंत महोत्सव सुरू

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

पूर्णानंद महिला मंच कणकवली आयोजित उत्सवी वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मा. सौ हर्षदा वाळके आणि विक्री शुभारंभ नगराध्यक्ष मा. श्री. संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. सभापती सौ वाळके यांनी फीत कापून महोत्सवाचे उद्‌घाटन केले, नगरसेविका डॉ.सौ. सुप्रिया नलावडे यांनी दीप प्रज्वलन केले तर नगराध्यक्ष श्री पारकर यांनी विक्री शुभारंभ केला.
शुभेच्छा देताना सभापती सौ. वाळके म्हणाल्या की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री पूर्वी असायची पण आता महीला स्वतःच एकमेकींच्या सहाय्याने सक्षम व यशस्वी होत आहेत. एकमेका साहाय्य करू अवघ्या होऊ यशस्वी हाच सध्याचा मूलमंत्र आहे.
श्री संदेश पारकर यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. पुढील महोत्सवाचे आयोजन आपण एखाद्या प्रशस्त आणि वर्दळीच्या ठिकाणी घेऊ जेणेकरून ग्राहक प्रतिसाद चांगला मिळेल असे अभिवचन दिले. ओटव गावाचे माजी सरपंच आणि कुडाळ देशकर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष श्री हेमंत परुळेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की पूर्वी महिला मुक्ती कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरावर राबविला जात असे आता महीला इतक्या सक्षम आणि स्वतंत्र विचाराच्या आहेत की पुरुषांना आत्मरीक्षण करण्याची गरज आहे.
या वेळी कणकवली नगरपंचायत नगरसेविका सौ दीपिका जाधव, कुडाळ देशकर समाज मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, अशोक नेरुरकर, ठाकूर गुरुजी, उदय ठाकूर, कमलाकर महाजन यांच्यासह पूर्णानंद महिला मंच पदाधिकारी उपस्थित होते.
सदर विक्री महोत्सव आज रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असणार असून इच्छुक ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!