नेरूर दशक्रोशीत दुग्धक्रांतीची नांदी

८ सप्टेंबरला मार्गदर्शन मेळावा
नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नेरूर तर्फ हवेली येथील मारुती मंदिर येथे होणार आहे.
मेळाव्यात सरंबळ पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. खवणेकर यांच्याकडून दुग्ध उत्पादन वाढीसाठीच्या आधुनिक पद्धती, पशुपालनातील महत्त्वाचे विषय तसेच शासनाच्या विविध योजना व अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती राहणार आहे.
‘शासन आपल्या दारी’ व ‘शेतकरी हितार्थ उपक्रम’ अंतर्गत आयोजित या मेळाव्याचा नेरूर दशक्रोशीतील दूध उत्पादक व पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






