खारेपाटण येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात नुकतीच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण या मंडळाच्या अध्यक्षा सौ आकांशा पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या कार्यक्रमाला खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे बौधाचार्य श्री संतोष मधुकर पाटणकर,राजापुर तालुका बौध्दजन सेवा संघाचे बौधाचार्य श्री महेंद्र पवार,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला महिला अध्यक्षा सौ आंकांशा पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करण्यात आली.यानंतर सामुदायिक बौध्द धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये खारेपाटण पंचशील नगर येथील धम्मवर्गातील मुलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बौधाचार्य श्री संतोष मधुकर पाटणकर व पत्रकार संतोष पाटणकर यांनी माता रमाई यांच्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर धम्म वर्गातील मुलांनी देखील त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा पर छान भाषणे सादर केली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण