नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेचे वार्षिक स्नेहसंमेलन १० फेब्रुवारीला

अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर-जोशी यांसह ऑरेंज ज्यूस टीमची असणार उपस्थिती

खारेपाटण येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचे शैशनिक वर्ष सन २०२३ – २४ वार्षिक स्नेह संमेलन येत्या १० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संपन्न होणार आहे. तर या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून अभिनेता हार्दिक उर्फ राणा दादा तर अभिनेत्री अक्षया उर्फ अंजली बाई यांसह ऑरेंज ज्यूसची टीम विशेष करून उपस्थित राहणार आहे.
विविध कला आविष्काराने नटलेल्या या कार्यक्रमासाठी सिनेकलाकर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर- जोशी यांसह सिनियर पोलीस अधीक्षक कांतीलाल कोथिंबीरे आणि मुंबई येथील ऑरेंज ज्यूस टीम चे कलाकार उपस्थित राहणार आहेत.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे प्रकटन करणारा हे वार्षिक स्नेह संमेलन असणार असून नॅशनल इंग्लिश स्कूल मिडीयम स्कूल नडगिवे च्या भव्य पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे सेक्रेटरी श्री मोहन कावळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!