संत राऊळ महाराज महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

जिल्हाभरातून १०७ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी

निलेश जोशी । कुडाळ : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरु केला आहे. अकृषी विद्यापीठीय  आणि महाविद्यलयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने संपूर्ण राज्यातले महावियालयीन शिक्षकेतर कर्मचारी या संपात उतरले आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे १०७ शिक्षकेतर कर्मचारी या संपत सहभागी झाले आहेत. कुडाळ येथील संत राऊळ महाराज कुडाळ युनिट अशासकीय महाविद्यालयीन  शिक्षकेतर कर्मचारी संघाच्यावतीने संत राऊळ महाराज महाविद्यालतल्या  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  या संपात सहभागी होऊन घोषणाबाजी केली.
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाला आजपासून बेमुदत सुरुवात केलेली आहे. हा संप शासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघ यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या संपातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. १. सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेला शासनाने रद्द केलेला आहे तर या प्रगती योजनेला शासनाने पुनर्जीवित करावे, २. तसेच सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करावी. ३. तसेच सातवा वेतन आयोग आदेशानुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी सातव्या वेतनानुसार द्यावी. ४. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असली पदे तात्काळ भरण्यासाठी मान्यता द्यावी. ५. तसेच 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. ६. तसेच विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी.अशा मागण्यांसाठी हा संप होत आहे.
यावेळी जिल्हा सहसचिव संगम कदम, कुडाळ युनिट प्रमुख पी. एम सावंत, युनिट सचिव चंद्रहास कुपेरकर, रतन माळगावकर,  सुधाकर घोगळे, गुंडू जाधव, विष्णुदास कुडाळकर, श्रीकृष्ण रेडकर, भास्कर गावडे, प्रवीण जाधव उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!