वालावल येथील मोफत आरोग्य शिबिराचा दीडशे रुगणांनी घेतला लाभ

निलेश जोशी । कुडाळ : श्रीमती मनोरमा महादेव चौधरी ट्रस्ट वालावल, ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल येथे नुकतेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचा दीडशे रुग्णांनी लाभ घेतला.


यावेळी नाक,कान ,घसा चिकित्सक डॉक्टर,ओंकार वेदक, जनरल तपासणी डॉक्टर,प्रणव प्रभू, दंत चिकित्सा स्पेशलिस्ट डॉक्टर अपूर्वा ठाकूर पिंगुळकर, नेत्र तपासणी व मोतीबिंदु निदान डॉक्टर परब आणि आर. बी. तेली यांनी रुग्णाच्या तापसण्या केल्या. यावेळी रुगणांच्या रक्ताच्या सर्व तपासणी करण्यात आल्या. वालावल परिसरातील अनेक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. श्रीमती मनोरमा महादेव चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!