विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चिती करा
विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंदार सावंत यांचे प्रतिपादन
युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात बी फार्मसी व डी. फार्मसी प्रथम वर्ष वर्गासाठी फार्मास्यूटिकल इंडस्ट्री बद्दल प्राथमिक माहिती आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन ओपेक्स प्रा. लि. कोल्हापूर यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप व ओपेक्स प्रा. लि. कोल्हापूरचे डायरेक्टर सचिन कुंभोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायभिमुख, बहुश्रुत व्यक्तिमत्व घडवणारे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करताना आनंद देणारे असावे. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चिती करणे आणि त्यात प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संस्थेचे खजिनदार मंदार सावंत यांनी दिले. फार्मसी हे जगातील तसेच भारतातील खूप मोठी रोजगार संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. सध्याच्या या काळात फार्मसी या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी आहेत आणि याची योग्य प्रकारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी अशा कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी व्यक्त केले. या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये फार्मसी क्षेत्राची सध्यस्थिथी फार्मास्यूटिकल कंपनीची कार्यप्रणाली तसेच फार्मसी मधील विविध करियर संधी या विविध विषयांवर श्री. सचिन कुंभोजे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्याशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक, उपाध्यक सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ.
रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे नियोजन
प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख प्रा. ऋषिकेश काटकर व किरण सुतार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समृद्धी पिसे व प्रा. नेहा गुरव यांनी केले.
दिगंबर वालावलकर / कणकवली