तमाशा आणि वारी

आज कणकवलीत आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटकघरात

तमाशा आणि वारी या दोन महत्वाच्या महाराष्ट्राच्या परंपरां. आहेत. त्या परंपरांचे छायाचित्राच्या माध्यमातून जतन करण्याचे काम संदेश भंडारे यांनी केले आहे. यांचे हे प्रकल्प देशभर गाजले आहेत.
संदेश भंडारे यांनी त्याचे प्रत्ययकारी चित्रण केले असून ते स्लाईड शो च्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करणार आहेत. हा स्लाईड शो वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटकघरात आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी रात्री 9.00 वाजता पाहायला मिळणार आहे. यावेळी ते छायाचित्र काढण्यामागील ची भूमिका सांगून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून 90 मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमात कणकवलीकर रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

कणकवली(प्रतिनिधी)

error: Content is protected !!