कुंभारमाठ ग्रामपंचायत माजी उपसरपंच विनोद भोगावकर यांचे 26-01-2024 रोजी पंचायत समिती मालवण येथे उपोषण

ग्रामपंचायत कुंभारमाठ कार्यक्षेत्रातील सर्वोदय कॉलनी रस्ता हा २६ नंबरला नोंद असून त्यावर ग्रामपंचायतीने रस्ता खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी खर्च केलेला आहे. त्या रस्त्यापुढे कुंभारमाठ येथील स्थानिक ग्रामस्थांची शेती आहे. ग्रामस्थांना आपल्या शेतात ये-जा जाण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.या संदर्भात मा. तहसिलदार मॅडम यांनी प्रत्यक्ष जागेवर येवून पाहणी केली असता ग्रामस्थांना या रस्त्याची अत्यंत गरज आहे हे निदर्शनास आले. त्याप्रमाणे त्यांनी हा रस्ता ग्रामपंचायत ने हस्तांतरीत करुन रस्ता मोकळा करावा असे आदेश देण्याल आले आहेत. तरी सुद्धा सर्वोदय कॉलनीचे चेअरमन या संदर्भात दखल घेत नाही आहेत. म्हणून दि. २६/०१/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता पंचायत समिती मालवण येथे ग्रामस्थांना घेवून माजी उपसरपंच विनोद भोगावकर उपोषण करणार आहेत.