अनप्लग” इव्हेंट मधे रामगड हायस्कूल चे अभिनंदनीय यश

रामगड(तालुका मालवण) – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,शासन अनुदानित शाळांमध्ये काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदयार्थ्यानी 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करावी व त्याबरोबर मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग,सांघिक कार्य(टीमवर्क),तार्किक विचार आणि कोडिंग याचे ज्ञान अवगत होईल यासाठी काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव हा इयत्ता 4थी ते 8वी मधील विदयार्थ्यासाठी घेण्यात आला .
या उत्सवात ‘अनप्लग’ इवेंटसाठी जिल्ह्यातील 711 विदयार्थ्यानी नोंदनी केली त्यापैकी 318 विदयार्थ्यानी यातील चेलेंज सोडवले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी 11 प्रशालेतील 33 विदयार्थ्याची ‘प्लगड’ इवेंट या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी निवड झाली.या 11प्रशालेमध्ये प्रगत विद्यामंदिर,रामगड,ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग या प्रशालेतील खालील तीन विदयार्थ्याची निवड झाली.
1)कु.ओमतेज उल्हास तारी
2) ” प्रणय शैलेश जाधव
3) ” जानू शंकर घाडीगांवकर
वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री. ए.एम.वळंजू सर यांचे मार्गदर्शन मिळाले
*सर्व यशस्वी विदयार्थ्याचे व मुख्याध्यापकांचे प्रशालेच्यावतीने
अभिनंदन करण्यात येत आहे