मा.नगराध्यक्ष समीर नलावडे यांना दिल्या शुभेच्छा

माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली ) व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या,
जेष्ठ पत्रकार, सर्व मंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर यांचे संकल्पनेतून नानाविध कार्यक्रम राबविण्यात येत असतानाच, दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला, १४ जानेवारी २०२४ रोजी समारोपाच्या पूर्वसंध्येला सर्व मंडळाचे सल्लागार दादा कुडतरकर, सुभाष उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मंडळाचे पदाधिकारी महेश मेस्त्री, विशाल रजपूत,बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, अविनाश गावडे, यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांना पर्यटन महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,
यावेळी सल्लागार दादा कुडतरकर ,सुभाष उबाळे यांनी व्यापारी मित्र मंडळाच्या दरवर्षीप्रमाणे व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे” आग्रहपूर्वक निमंत्रण दिले, तसेच सर्व मित्र मंडळांच्या वतीने, पेडणेकर यांचा ६० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, त्याचेही आमंत्रण दिले,
*याप्रसंगी मा. उप नगराध्यक्ष गायकवाड, नगरसेवक संजय कामतेकर, मा उप नगराध्यक्ष बंडु हर्णे, जिल्हा बॅंक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक पारकर उपस्थितीत होते,
*पत्रकार मित्र रविकांत जाधव हेही उपस्थितीत होते,
*सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,