सत्य आपणाला सामर्थ संपन्न करते – जिल्हा संघटक विजय चौकेकर

तरुणांनो तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करा . मज्जातंतूत शक्ती संपन्न करा . आपल्याला लोखंडी स्थायूंचे पोलादी मज्जातंतू हवे आहेत . तुम्ही मनुष्य बना . मनुष्य बनविणारा धर्म हवा आहे . मनुष्य बनविणारा सिद्धांत हवा आहे . मनुष्य बनविणारे शिक्षण हवे आहे . असे स्वामी विवेकानंदांनी तरुणांना आवाहन या आपल्या लिहिलेल्या पुस्तकात सांगितलेले आहे . एवढेच नव्हे तर सत्य आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात केल्यानेच मिळू शकते . सत्य आपल्याला संपन्न करते . सत्य म्हणजे पावित्र . सत्य म्हणजे बळ आणि सत्य म्हणजे उत्साह . आणि हे सत्य चिकित्सक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारल्यानेच आपल्यात येऊ शकते असे स्वामी विवेकानंद सांगतात . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय
चौकेकर यांनी केले .
मुंबई विद्यापीठ संलग्रित कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष निवासी शिबीर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत सविता आश्रम पणदूर अणाव ता . कुडाळ, जि . सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते .या शिबिरात समन्वयकांनी मुलांसाठी बौद्धिक चर्चासत्राचे आयोजन केले होते . यातील एक चर्चासत्र स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिना निमित्त स्वामी विवेकानंदांचे तरुणांसाठी आवाहन आणि तरुणातील अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टीकोन . याविषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . यावेळी त्यांच्या समवेत विचार मंचावर राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा . उमेश मि . कामत सर , प्रा . भावेश चव्हाण सर , प्रा . योगिता वाईरकर मॅडम , प्रा . गिताश्री ठाकूर मॅडम ,
विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल चव्हाण , जान्हवी परुळेकर तसेच जिल्हा युवा सह संघटक सहदेव पाटकर सर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी विजय चौकेकर यांनी विद्यार्थांचा मनातील अंधश्रद्धा विषयक बाबींबाबत सखोल मार्गदर्शन केले . तसेच जादूटोणा विरोधी कायदयाअंतर्गत बारा अनुसूचीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले : महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जादूटोणा विरोधी कायदा सविस्तर पणे समजावून दिला . मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची गरज आणि महत्व समजावून दिले .
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचा संयुक्तपणे हे व्याख्यान आयोजित केले होते .

error: Content is protected !!