खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूचे घबाड पोलिसांच्या हाती

14 लाख 74 हजार रुपयांची दारू जप्त
कणकवली पोलिसांची कारवाई
खारेपाटण चेकपोस्ट वरून टेम्पोतून दारू वाहतूक करणाऱ्या राजस्थान येथील संशयित आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 14 लाख 74 हजार 560 रुपयांची गोवा बनावटीची दारू खारेपाटण चेक पोस्ट येथे कणकवली पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण भगाराम रेबारी (वय 43 वर्षे, राहणार मुक्काम पोस्ट आमेट तालुका आमेट जिल्हा राजसमंद राज्य – राजस्थान) याच्या विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये 10, लाखाचा टाटा कंपनीचा पॅक बॉडीचा नारंगी रंगाचा टेम्पो (RJ 27 GD 9271), 14 लाख 74 हजार 560 रुपयांची गोवा बनावटीच्या दारू ने भरलेल्या 180 मिली मापाच्या कंपनी सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या. प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या ह्याप्रमाणे एकूण 24 हजार 576 बाटल्या प्रत्येक बाटली ची किंमत 60 रुपये प्रमाणे. दारू हस्तगत करण्यात आली. अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.