वृद्धाला धडक देऊन पळाल्या प्रकरणी बोर्डवेतील कार चालक अटकेत

मारुती कार सहीत कणकवली पोलिसांनी घेतले ताब्यात

कणकवली पोलिसांची दोन पथके करण्यात आली होती नियुक्त

वागदे डगलळघाटी येथे धडक देऊन पळून गेलेला वाहन चालकाच्या मुसक्या अखेर कणकवली पोलिसांनी आवळल्या. वागदे येथे डगळघाटी तेथेच राहणारे सत्यवान महादेव तोरोसकर (61) यांचा काल अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. महामार्गावर धडक देऊन यातील वाहन चालकाने पळ काढला होता. मात्र याकरता कणकवली पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधा करिता दोन पथके नेमून रात्रभर गस्त सुरू केली. या गस्तीमध्ये मुकेश मारुती मोडक (वय – 34 – वर्षे ,राहणार -बोर्डवे मधली वाडी तालुका कणकवली) हा पळून गेलेला संशयित मारुती कार सहीत ताब्यात घेतला. त्याच्यावर भादवि कलम 304(A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. सत्यवान तोरोसकर यांना धडक देऊन पळाल्या नंतर पोलिसांनी याबाबत संशयित वाहन चालकाची शोध मोहीम गतीने सुरू केली. यामध्ये हायवे वरील सर्व हॉटेल, धाबे, गाडी थांबण्याची ठिकाणे चेक केली होती. तसेच वारंवार चेक पोस्ट येथील अंमलदार यांच्या संपर्कात राहून माहिती घेत होते. अपघात केलेल्या वाहनाबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. घटने वेळी अंधार असल्याने सीसीटीव्ही कॅमेरा मध्येही काच फुटलेली वाहने ओळखता येत नव्हती.तरीही पोलीस स्टेशन मधील रात्र गस्त करता असलेले अधिकारी आणि अंमलदार यांनी माहिती घेत प्रयत्न करून आरोपीला त्याच्या गडीसह ताब्यात घेतले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!