अप्पासाहेब पटवर्धन चौकात बिहारी तरूणाला दिल्या शुभेच्छा

माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ आणि अप्पासाहेब पटवर्धन चौकातील ( कणकवली) उपस्थितीत सर्व च व्यावसायिकांच्या वतीने जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांचे बंधू पंडित यांच्या हस्ते परराज्यातील तरूणाला पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या,

यावेळी पटवर्धन चौकातील व्यापारी वर्ग, रिक्षा व्यावसायिक, बांधकाम कर्मचारी, प्रशांत म्हापसेकर, व्ही एस राणे, इत्यादी उपस्थितीत होते,

गौरव झा यांनी आपले मनोगत व्यक्त केले,

माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, बाबा भालचंद्र महाराज यांच्या दर्शना करीता जात असतानाच, या तरूणाची अचानक भेट झाली, विचारपुस करत असताना या युवकांने जी काही माहिती दिली, त्यामुळे आम्ही भारावून गेलो, आणि या तरूणाला अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये येण्याची विनंती केली, विनंती ला मान देऊन गौरव झा ( बिहार) पटवर्धन चौकात आल्यावर, आम्ही समस्त कणकवली वासी यांच्या वतीने करंबेळकर काका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, पुढील प्रवासा करिता शुभेच्छा दिल्या,

*यावेळी उपस्थितीत सर्वांनी अभिनंदन केले, आणि शुभेच्छा दिल्या,

error: Content is protected !!