मालपे येथे जागा झाला शिवकालीन इतिहास!

मालपे ऍग्रो टुरिझम मालपेवाडी, पोंभुर्ले- देवगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजन माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष प्रसाद मालपेकर तसेच सह आयोजन सुहास मालुसरे यांनी तर संकल्पना सजावट तसेच सूत्रसंचालन याची मुख्य जबाबदारी मालपे ऍग्रो टुरिझमचे व्यवस्थापक श्री प्रशांत सदाशिव परब यांची होती. दिग्दर्शन कुमारी हर्षदा दिलीप सुतार, तन्वी सुतार यांनी केले. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील तळागाळातील ग्रामीण कलाकारांना त्यांच्या प्रतिभेला वाव देणे तसेच त्यांच्या कलागुणांना चांगले व्यासपीठ मिळवून देणे ,संपूर्ण कोकणातील गावांमध्ये ग्रामस्थांना ग्राम विकासाबद्दल जागृत करणे तरुणांना व्यसनापासून प्रवृत्त करणे आणि छत्रपती शिवराय व त्यांच्या शूर मावळ्यांचा ज्वलंत इतिहास जीवन जगण्याची कार्यपद्धती ,तसेच रयतेसाठी असलेले लोक कल्याणकारी धोरण याची जनजागृती करणे हे होते. यावेळी हर्षदा दिलीप सुतार, तनवी दिलीप सुतार शौर्य दिलीप सुतार प्राजक्ता प्रमोद फाळके जय प्रमोद फाळके अनुष्का चंद्रकांत घाडी पूर्वा चंद्रकांत घाडी गौरी संदीप घाडी सानवी संदीप गाडी, तनवी जयवंत समजिसकर पूजा उमेश गिरकर, सार्थक महेश वेदरकर वेदिका प्रकाश ढिपळे आदित्य प्रभाकर ढिपळे आदी कलाकार सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमांमध्ये पूजा जयवंत समजिसकर, पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, संतोष भुवद, पोलीस पाटील विलास सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस अधिकारी श्री विलास गोपाळ सुतार, श्री जयवंत रामचंद्र केसरकर, हेमंत समजीस्कर, सौ निशा महेश वेदरकर, श्री अरमान हमीद सोलकर, संजय भाई सुतार, राजा भाई ठाकूर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मालपे ऍग्रो टुरिझमचे व्यवस्थापक श्री प्रशांत सदाशिव परब यांनी केले.
मसुरे | झुंजार पेडणेकर