प्रवाहित वीज तारेचा शॉक लागून सांगवे मध्ये वृद्धाचा मृत्यू

सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये (55) यांचा तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्या मुळे पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता विनोद हे सांगवे – तेलंगवाडी येथील दत्त्याचा उचवळा येथे तुटून पडलेल्या विद्युत वायरनजीक मयत स्थितीत पडलेले आढळले. घटनेची माहिती समजताच महावितरणचे अधिकारी व पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळ गाठले होते. विनोद यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा, तीन विवाहित भाऊ असा परिवार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!