आचरा हिर्लेवाडी ग्रामपंचायत रस्ता कामाचा शुभारंभ

आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला शुभारंभ
आचरा–अर्जुन बापर्डेकर जिल्हा वार्षिक नियोजन मधून ४५०मिटर मंजूर झालेल्या आचरा हिर्लेवाडी ते ग्रामपंचायत या मुख्य रस्त्याकामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळीउपसरपंच संतोष मिराशी, सदस्य महेंद्र घाडी,चंदू कदम,बबलू गावकर,माजी उपसरपंच पांडूरंग वायंगणकर,लवू मालंडकर,
विष्णू पेडणेकर, संजय मुणगेकर, सुशिल आचरेकर,मोहन मेस्त्री, वझे ठेकेदार माने,यांसह सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.