‘एक वाडी एक संघ’ क्रिकेट स्पर्धेत दुर्गावाडला विजेतेपद

महापुरुष-११ शेटकरवाडी उपविजेता
पिंगुळी-शेटकरवाडी येथे रंगल्या क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील महापुरुष ११ शेटकरवाडी क्रिकेट संघ आयोजित एक वाडी एक संघ स्पर्धेत अंतिम रोमहर्षक लढतीत दुर्गावाड संघ अंतिम विजेता तर महापुरुष११ शेटकरवाडी उपविजेता ठरला.
शेटकरवाडीतील सर्व खेळाडू आणि हौशी क्रिकेट प्रेमीच्या सहकार्याने दोन दिवस उंचवळा मैदानावर क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धे दरम्यान १६ संघाची साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. अंतिम रोमहर्षक लढतीत दुर्गावाड संघ विजयी झाला. उद्धाटन सेवानिवृत्त आर्मी सूर्यकांत पालव यांच्या हस्ते झाले. उद्धाटन व बक्षीस वितरण प्रसंगी मनसे उपतालुकाध्यक्ष, गजानन राऊळ, महेश पालकर, सुर्यकांत पालव, मुन्ना दळवी, सुमन सावंत, संजय सावंत, सुभाष लाड, बंड्या धुरी वासुदेव शेटकर समीर दळवी छोटू दळवी सयाजी मोर्यें, सुनील पालव, बाबल्या धुरी, लवू पालव, अंकुश पालव, सचिन पालकर, रवी पालकर, प्रथमेश धुरी, ओंकार सावंत आदी मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक.दुर्गावाड, द्वितीय क्रमांक महापुरुष- ११ शेटकरवाडी, उत्कृष्ट फलंदाज – उजेर मुजावर दुर्गावाड, उत्कृष्ट गोलंदाज- अमित झोरे दुर्गावाड, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- अनास दुर्गावाड, उत्कृष्ट यष्टिरक्षक – रामदास सावंत महापुरुष ११ शेटकरवाडी, मालिकावीर – रुपेश धुरी महापुरुष शेटकरवाडी यांनी मिळविला. विजेत्या संघास रू 7001 महापुरुष शेटकरवाडी व भव्य चषक कै महादेव दळवी स्मरणार्थ वैभवी साँ मिलचे मालक सचिन दळवी कडून तर उपविजेत्या संघास रू 4001 गजानन राऊळकडून व भव्य चषक कै अर्जुन सावंत स्मरणार्थ युवा उद्योजक सौरभ सावंत याजकडून देण्यात आला. पंच म्हणून रामदास सावंत, राजु सावंत, संदिप सडवेलकर, प्रथमेश धुरी, प्रविण सावंत यांनी काम पाहिले. समालोचनाची जबाबदारी छोटु दळवी, विश्वजीत पालव, नितिन गोलतकर यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय मोर्ये यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.