चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव २६डिसेंबरपासून
आचरा –अर्जुन बापर्डेकर चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीचा यात्रोत्सव मंगळवार दिनांक २६डिसेंबर ते ३०डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे..पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.मंगळवार सकाळी नऊ वाजता यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे.दुपारीबारा वाजल्यापासून श्री देवी भगवती माऊलीस मानकरी यांच्या तर्फे महाप्रसाद अर्पण केला जाणार. रात्रौ अकरा वाजता ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहेत.पहाटे तीन वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.बुधवार २७डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून स्थानिक भजने.यातरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवूळवाडी,तेरई प्रासादिक भजन मंडळ, रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान गोपीकृष्ण गुरुकुल भजन मंडळ भांडूप मुंबई यांचे भजन होणार आहे.,रात्रौ ९वाजल्यानंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम.गुरुवार २८ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्या पासून स्थानिक भजने यात सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी,गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी,श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी,वाडत्रि ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी रात्रौ ९ वाजता पुराण, गोंधळ, आरती आदी कार्यक्रम. शुक्रवार २९ डिसेंबर रोजी ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, श्री देवआकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी, रात्रौ नऊ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम. शनिवार ३०डिसेंबर रोजी दुपारी तीन ते सहा चालू वहिवाट दार सर्व महिला, अर्चना घाडी, अनिता घाडी, सुनीता घाडी, अंकिता घाडी यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी सहा नंतर स्थानिक भजने यात पिसाळि ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई,भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत.रात्रौ दहा वाजता वाळू गृप यांच्या सौजन्याने कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ नेरुर यांचा पराशक्ती दहन अर्थात भावई महिमा हा नाट्य प्रयोग होणार आहे.यानंतर रात्रौ 2.३० नंतर गोंधळ किर्तन , लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.