काल कणकवलीतल्या दुचाकी चोरीचा सिंधुदुर्ग “एलसीबी” पथकाकडून पर्दाफाश
“एलसीबी” च्या सिंधुदुर्गच्या पथकाची कौतुकास्पद कारवाई
चोरीला गेलेल्या दुचाकीसह संशयित आरोपीला केली पणदूर मधून अटक
कणकवली शहरात महामार्गावर जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स या दुकानाच्या समोर पार्किंग करून ठेवलेली मालवण येथील अस्मिता मयेकर यांची एक्टिवा दुचाकी mh 07 al 5204 ही काल कणकवलीतून चोरीला गेली होती. या दुचाकीला चावी लावून ठेवलेली असल्यामुळे चोरट्याने दुचाकी हातोहात लंपास केली होती. सीसीटीव्ही मध्ये चोरटा कैद झाला होता. परंतु त्याचा शोध लागत नव्हता. दरम्यान याप्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने आपल्या गुप्त खाबऱ्यांमार्फत याबाबतची माहिती काढत अत्यंत शिताफीने या प्रकरणातील आरोपी किशोर मारुती खरात (वय 23 नाटळ तालुका कणकवली) याला चोरीला गेलेल्या एक्टिवा दुचाकीसह (आणाव तालुका कुडाळ) येथून अटक केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, राजू जामसाडेकर, हवालदार किरण देसाई, आशिष जामदार, आदींच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या सह अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या तपास कामाबद्दल कौतुक केले जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली