पांग्रड-निरूखे येथील मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पांग्रड-निरूखे ठरला राज्यातला पहिले ई -हेल्थ कार्डधारक गाव

मार्चपर्यंत तीन महाआरोग्य शिबिरे घेणार – महेश खलिपे

भविष्यात कॅन्सर निदान आणि उपचारसाठी प्रयत्न करणार – विजय चव्हाण

प्रतिनिधी । कुडाळ : महाआरोग्य शिबीर काळाची गरज आहे. अशा प्रकारचे शिबीर ग्रामीण भागात होत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. महाआरोग्य शिबिरातून लोकांची काळजी घेतली जात आहे ही खुप मोठी गोष्ट आहे, सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहीजे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे येथील रूग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देता येणार आहे. भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्ह्यात अशाच प्रकारे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील असे प्रतिपादन वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ प्रकाश गुरव यांनी केले. पांग्रड निरुखे महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पांग्रड निरुखे गांव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील राज्यातील पहिला ई हेल्थ कार्डधारक गाव ठरला आहे दुपारच्या सत्रात सुमारे १ हजार ३०० हुन अधिकांनी या भव्य शिबिराचा लाभ घेतला.


पंचायत समिती कुडाळ, आरोग्य विभाग जि.प. सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत पांग्रड-निरूखे आयोजित तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, एन.व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड-निरूखे व पांग्रड-निरूखे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गाव, पंचक्रोशी, दशक्रोशी सुदृढतेसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच अनेक दुर्धर व्याधींवरील तपासण्या, निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सर्व सेवा एकाच शिबिरात मोफत उपलब्ध असणारे महाआरोग्य शिबिर तसेच सर्व महत्त्वाची उपकरणे, साधने व सुविधांनी सुसज्ज असे हे शिबिर आज एन.व्ही. कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड येथे आयोजित करण्यात आले होते. आहे. शिबिराचे उद्घाटन डिन डॉ गुरव यांच्या हस्ते झाले यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर डॉ. विद्याधर तायशेटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिफे, माध्य शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. देविदास चव्हाण, डॉ. शरण चव्हाण, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. वर्षा रोकडे-चव्हाण, डॉ. पी. डी. वजराटकर, डॉ. लिहितकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जुईली, डॉ. आनंद फड, डॉ. बिजेंद्र तोडावे, डॉ. अभिजीत त्रिपाठी, डॉ. ओमकार वेदक, डॉ. सुरज शुक्ला, डॉ. समीर मर्गज डॉ. राजेश सावंत, डॉ. हर्षदा माळवदे, राजेंद्र केळकर आदी ४० हुन अधिक डॉक्टर्स तसेच निमंत्रक प्रशासक तसेच कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण, डॉ. संदेश कांबळे, संस्था चेअरमन आर. टी. मर्गज, पांग्रड सरपंच श्रीम. कावेरी चव्हाण, निरुखे सरपंच कीर्तीकुमार तेरसे, उमेश गाळवणकर, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, प्रा.अरुण मर्गज, उपसरपंच श्रीम. महानंदा मेस्त्री, रामकृष्ण तेरसे, सामाजिक कार्यकर्ते के टी चव्हाण, रघुनाथ चव्हाण, औदुबर मर्गज, प्रकाश तेडोलकर, ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, पांग्रड निरुखे गाव महाराष्ट्रातील पहिले ई हेल्थ उपकेंद्र करण्याचा मानस होता तो आज यशस्वी झाला. सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी, रोगनिदान व तातडीचे उपचार या ठिकाणी करण्यात आले. डेरवण येथील वालावलकर कॅन्सर हॉस्पिटलच्या पथकाद्वारे सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची तपासणी निदान व उपचार तसेच भविष्यकालीन सेवांचा मानस आहे.
बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी विंग द्वारे प्रात्यक्षिक व उपचार कान, नाक, घसा विकाराच्या सर्व तपासण्या निदान व उपचार दंतरोगावरील तपासणी निदान व उपचार. स्त्रीरोग संदर्भात तज्ज्ञांकडून तपासणी निदान व उपचार. सर्व प्रकारचे त्वचारोग तपासणी निदान व उपचार करण्यात आले. मानसिक आरोग्य तपासणी निदान व उपचार व मार्गदर्शन ही शिबिराची वैशिष्ट्ये असल्याचे सांगून या महाआरोग्य शिबिरात दुपारपर्यत तेराशेहुन अधिकांनी या भव्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी डॉ महेश खलिफे यांनी सांगितले की,गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी अतिशय उत्तमरित्या या महाआरोग्य शिबिराचे नियोजन केले आहे. अशाच प्रकारची तीन महाआरोग्य शिबिरे जिल्ह्यात मार्च महीन्यात आयोजित केली जातील असे जाहीर केले.
मुश्ताक शेख यांनी सांगितले की, आपले शरीर हेच शेवटपर्यंत साथ देते, त्यामुळे शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ निगुडकर यांनी या गावचा पुत्र या नात्याने येथील रूग्णांना सेवा देणे कर्तव्य असुन या ठिकाणी विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यानी उत्कृष्ट नियोजन केले असे सांगत महाआरोग्य शिबिर कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश तेडोलकर यांनी केले

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!