आशिये ग्रामपंचायतच्यावतीने १३ जुनला आरोग्य शिबिराचे आयोजन

आशिये गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ; सरपंच महेश गुरव यांचे आवाहन
आशिये ग्रामपंचायतच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार असून त्यामध्ये रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी एचपीव्ही लसीकरणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हृदयरोग व एचपीव्ही लसीकरणाबाबत विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच डोळ्यांची तपासणी आणि चष्म्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच ज्या रुग्णांची डोळ्याची शस्त्रक्रिया ग्रामपंचायतच्यावतीने केली जाणार आहे. कमी वजनाच्या बालकांची तपासणी करण्यात येणार आहे.शिबिरादरम्यान आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर तपासणीसाठी नागरिकांनी उपाशीपोटी सकाळी 9 वाजता येणे आवश्यक आहे. तरी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.





